पारवा (जिल्हा यवतमाळ) येथे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या !

भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणारी घटना !

यवतमाळ, १६ मे (वार्ता.)- जिल्ह्यातील पारवा या गावात महादेव मंदिराजवळ १६ मे या दिवशी अनिल ओचावार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलीस या प्रकरणी अन्वेषण करत आहेत. अनिल ओचावार हे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत होते. त्यांचा अनेक सामाजिक कार्यात सहभाग होता. पारव्याचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली.