अमृतसर (पंजाब) – भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यापूर्वी सिंगला यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनी त्यांची हकालपट्टी केली. सिंगला यांनी नोकरीचे कंत्राट देतांना १ टक्का ‘कमिशन’ची मागणी केली होती. या प्रकरणी ठोस पुरावे सापडल्याने मुख्यमंत्री मान यांनी सिंगला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. मान यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
आम आदमी पार्टी का जन्म ईमानदार सिस्टम कायम करने के लिए हुआ है…@ArvindKejriwal जी ने हमेशा कहा है कि भ्रष्टाचार को बर्दाश्त नहीं करेंगे चाहे कोई अपना हो या बेगाना
स्वास्थ्य मंत्री के खिलाफ भ्रष्टाचार के सबूत मिलते ही तुरंत बर्खास्त किया…साथ ही FIR के आदेश दिए pic.twitter.com/0g9nqGteHb
— Bhagwant Mann (@BhagwantMann) May 24, 2022
संपादकीय भूमिकासरकारने अशांना केवळ अटक करून थांबू नये, तर त्यांची सर्व संपत्तीही जप्त केली पाहिजे ! |