सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय तळमळीने करून तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणारी कु. अवनी छत्रे (वय २४ वर्षे) !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय  तळमळीने केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अल्पावधीत अवनीचे त्रास न्यून झाले. गुरुकृपा, संतांचा चैतन्यमय सहवास आणि मार्गदर्शन अन् साधकांच्या शुभेच्छा यांचा तिला लाभ झाला. 

नामजप अखंड होत असल्याने ‘स्वतः चैतन्याच्या अखंड स्रोतात असून ‘स्वतःच्या सर्व कृती ईश्वरच करत आहे’, असे अनुभवणारे देवद (पनवेल) येथील होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (वय ६८ वर्षे)!

काही वेळा सेवा करतांना चैतन्य एवढे वाढते की, मला सेवा करणे शक्य होत नाही आणि मला काहीवेळ डोळे मिटून बसावे लागते. अशा वेळी प्रार्थना करून मला त्या अवस्थेमधून बाहेर पडावे लागते.

लहानपणापासून सात्त्विक वृत्ती आणि दैवी गुण अंगी असलेल्या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) !

(पू.) सौ. सुनीता खेमका यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर मनात कुठलाही विकल्प न येता त्यांनी सर्वच सेवा कशा परिपूर्ण केल्या, त्यांची गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट आणि त्यांनी तेव्हा अनुभवलेले भावक्षण, गुरुदेवांवर असलेली दृढ श्रद्धा आणि साधना करतांना आलेल्या अनुभूती हा भाग पहाणार आहोत.

‘निर्विचार’ हा जप करतांना सहस्रारावर संवेदना जाणवून ध्यान लागणे

‘निर्विचार’ हा नामजप करायला आरंभ केल्यावर मला माझ्या सहस्रारावर सतत संवेदना जाणवून अधूनमधून माझे ध्यान लागते आणि जप विसरला जाऊन केवळ सहस्रारामध्ये चालू असलेल्या स्पंदनांकडे लक्ष जाते. त्या वेळी मला एकदम शांत वाटून ‘या स्थितीमधून बाहेर पडूच नये आणि काही न करता केवळ ती स्थिती अनुभवत रहावे’, असे मला वाटते.

कर्मकांडाप्रमाणे साधना करणारे आणि अंत्यसमयीही गुरुस्मरण करणारे गंगाखेड (जिल्हा परभणी, महाराष्ट्र) येथील ६१ टक्के पातळीचे कै. दत्तात्रय किशनराव आय्या (वय ८३ वर्षे) !

२७.१.२०२३ या दिवशी गंगाखेड येथील दत्तात्रय किशनराव आय्या (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले, त्यानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारा त्यांचा मुलगा श्री. कृष्णा आय्या आणि सून सौ. सारिका आय्या ..

‘निर्विचार’, हा नामजप ऐकतांना रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील श्री. विनयकुमार यांना आलेल्या अनुभूती

श्री. विनय कुमार यांनी आध्यात्मिक स्तरावरील विविध उपाय करून न्यून न झालेला ताण १० मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप ऐकल्यावर लगेचच न्यून होणे

‘समर्पण’ आणि ‘साधनावृद्धी’ या ‘ऑनलाईन’ सत्संगांमुळे जिज्ञासूंना झालेले लाभ, शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्यामध्ये झालेले पालट !

सत्संगांमुळे जिज्ञासूंना नामजपाचे महत्त्व, नमस्काराची योग्य पद्धत, तसेच विविध सणांविषयी शास्त्रोक्त माहिती मिळणे तसेच स्वभावदोष निर्मूलनाविषयी समजल्यावर स्वभावदोषांवर मात करता येणे…

‘निर्विचार’, हा नामजप ऐकतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘निर्विचार’, या नामजपामुळे सौ. संगीता चव्हाण यांना अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहं यांची केंद्रे पुसली जात असून अंतर्मनात पांढरा शुभ्र प्रकाश दिसत होता.

‘निर्विचार’ नामजप करत असतांना देवद, पनवेल येथील सौ. समिधा संजय पालशेतकर यांना आलेल्या अनुभूती

नियमित प्रार्थना केल्यानंतर ‘माझे मन निर्विचार होऊन एका पोकळीत खोल जात आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित होऊन आत चालू असलेला नामजप मला ऐकायला येत आहे’, अशा अनुभूती यायला लागल्या. ही शांतता अनुभवणे फारच सुंदर आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले ‘निर्विचार’ अखेरचे नाम देती ।

अद्भुत ती करणी गुरुनामाची।
परम पूज्य ‘कुलदेवी’चा नामजप सांगती।।
अनंत ती शक्ती गुरुसंकल्पाची।
परम पूज्य ‘निर्विचार’ अखेरचे नाम देती।।