१. ‘१७.६.२०२१ या दिवशी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये ‘निर्विचार’, हा नामजप ध्वनीक्षेपकावर लावला होता. तो नामजप ऐकतांना माझे मन निर्विचार झाले होते.
२. थोड्या वेळाने मला माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवू लागल्या.
३. ‘नामजप माझ्या अंतर्मनात जात आहे’, असे मला जाणवत होते.
४. ‘निर्विचार’, या नामजपामुळे माझ्या अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहं यांची केंद्रे पुसली जात आहेत’, असे जाणवून माझ्या अंतर्मनात पांढरा शुभ्र प्रकाश दिसत होता.
५. नामजप संपल्यावर मला दिवसभर हलके आणि शांत वाटत होते.’
– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |