गुरुनामाला अमृताची गोडी।
परम पूज्य (टीप १) भेटती निर्गुणातूनी।। १।।
अवीट ती गोडी गुरुस्मरणाची।
परम पूज्य अंतर्मुख करती।। २।।
अगणित गोडी गुरुचरणांची।
परम पूज्य चैतन्य देती।। ३।।
अद्भुत ती करणी गुरुनामाची।
परम पूज्य ‘कुलदेवी’चा नामजप सांगती।। ४।।
अनंत (टीप २) ती शक्ती गुरुसंकल्पाची।
परम पूज्य ‘निर्विचार’ (टीप ३) अखेरचे नाम देती।। ५।।
अफाट तळमळ गुरुसेवेची।
परम पूज्य सेवा करूनी घेती।। ६।।
अनमोल अनुभूती गुरुकृपेची।
परम पूज्य साधकांना मोक्षासी नेती।। ७।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – अमर्याद, विष्णु
टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार साधनेच्या आरंभी भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी ‘कुलदेवते’चे नामस्मरण करण्यास सांगितले. साधनेचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर त्यांनी साधकाची साधनेची स्थिती, साधकांचा त्रास आणि काळ यानुसार विविध जप दिले. १३.५.२०२१ या दिवशी ‘निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः।’ हा नामजप साधनेच्या अंतिम ध्येयाकडे मार्गक्रमण करण्यास, म्हणजेच निर्गुण स्तरावरील निर्विचार स्थितीला जाण्यासाठी सांगितला आहे.
– पू. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.५.२०२१)
|