‘१४.५.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली निर्विचार नामजप करण्याविषयी सूचना वाचली. हा नामजप केल्यावर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. नामजप करतांना मनात पुष्कळ विचार येणे
मी प्रतिदिन सकाळी ७.३० ते ८ या वेळेत नामजपासाठी बसते. तेव्हा माझ्या मनात पुष्कळ विचार येतात. त्यामुळे मी जप करतांना वही आणि लेखणी घेऊन बसणे चालू केले. मनात जे विचार येतील, ते लिहून ठेवायला आरंभ केला, तरीही ‘मनात काहीतरी चालूच असते’, एवढेच माझ्या लक्षात आले.
२. मन निर्विचार होण्यासाठी देवाने प्रार्थना सुचवणे आणि प्रार्थना केल्यावर मन निर्विचार होऊन अनुभूती येणे
तेव्हा देवानेच मला प्रार्थना सुचवली की, ‘हे श्रीकृष्णा, माझे मन निर्विचार होऊ दे.’ त्यानंतर ‘माझे मन निर्विचार होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी प्रतिदिन ही प्रार्थना करायला लागले. नियमित प्रार्थना केल्यानंतर ‘माझे मन निर्विचार होऊन एका पोकळीत खोल जात आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित होऊन आत चालू असलेला नामजप मला ऐकायला येत आहे’, अशा अनुभूती यायला लागल्या. ही शांतता अनुभवणे फारच सुंदर आहे.
वरील प्रार्थना गुरुमाऊलीनेच सुचवली आणि त्यांनीच अनुभूती अनुभवण्यास दिली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. समिधा संजय पालशेतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |