रशियाच्या बाजूने सीरियातील इसिसचे आतंकवादी लढणार ?
एवढे निश्चित आहे की, युद्धभूमीवर रशियाच्या सैन्याचे रक्त सांडले जात आहे आणि त्यासाठी त्यांचे सैनिक सिद्ध नाहीत. अशा परिस्थितीत सीरियामधून आतंकवाद्यांना आणण्याचा प्रयत्न होत आहे.
एवढे निश्चित आहे की, युद्धभूमीवर रशियाच्या सैन्याचे रक्त सांडले जात आहे आणि त्यासाठी त्यांचे सैनिक सिद्ध नाहीत. अशा परिस्थितीत सीरियामधून आतंकवाद्यांना आणण्याचा प्रयत्न होत आहे.
रशियाचे रणगाडे १००-२०० किलोमीटर परिसरात पसरले आहेत. शत्रूची वाहने शहराच्या आत आलेली आहेत. त्यांच्यावर युक्रेनचे सैनिक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने आक्रमणे करून त्यांचा घात करत आहेत आणि याविषयीच्या अनेक चित्रफिती प्रसारित झाल्या आहेत.
भारत सरकारने जोखीम पत्करून ‘ऑपरेशन गंगा’च्या अंतर्गत युक्रेनच्या युद्धभूमीवर अडकलेल्या ९० टक्क्यांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचे कार्य पार पाडले आणि उर्वरित भारतियांना परत आणणे चालू आहे.
युक्रेनमध्ये १८ सहस्र पैकी ७०० ते ८०० विद्यार्थी अजूनही अडकलेले आहेत. युद्धबंदी झाली, तरच त्यांना तेथून बाहेर येता येणार आहे. त्यासाठीच भारत या दोन देशांशी पुनःपुन्हा बोलणी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे ते भारताचे ऐकून युद्धबंदी करत आहेत !
युक्रेनने त्यांना आत येऊ दिले आणि गनिमी कावा युद्धाच्या काही चांगल्या युक्त्या वापरल्या. या सैन्याच्या मागाहून अन्न-पाण्याची रसद (पुरवठा) घेऊन येणार्या सैन्यावर त्यांनी आक्रमण केले. त्यामुळे रशियाची अडचण झाली.’
जेव्हा कठीण वेळ येतो, तेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो, भारतानेही अशा प्रकारची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. युक्रेन युद्धाचा एक भारतीय या नात्याने अभ्यास करू शकतो.
चीन हा रशियाचा एक सर्वांत महत्त्वाचा सामरिक सहकारी असून तो विविध प्रकारे रशियाला साहाय्य करत आहे. त्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या विरोधात मतदान करायचे टाळले. याउलट चीन आता रशियाशी व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
रशिया-युक्रेन युद्धामध्ये युक्रेन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करत आहे. रशिया अधिकाधिक धोकादायक शस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
रशियाने जर युक्रेनमध्ये ‘व्हॅक्युम बाँब’ वापरला असेल, तर ते अतिशय चुकीचे आहे; कारण आंतरराष्ट्रीय कायदा एवढा मोठा विध्वंसक बाँब वापरण्याची अनुमती देत नाही. त्यामुळे रशियाची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे.
या युद्धापासून भारताला शिकता येईल की, अनेक मित्र राष्ट्र करार करून ‘आम्ही तुम्हाला साहाय्य करू’, असे सांगतात; पण वेळ पडली, तर ते साहाय्य करतीलच, असे नाही. त्यामुळे आपण संरक्षणामध्ये आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि सर्व मोठी शस्त्रे ही भारतातच बनवली पाहिजेत, याला पर्याय नाही.’