चला ! सोप्‍या भाषेत आयुर्वेद शिकूया !

पोळी बनवण्‍यासारखे लहानसे काम असो किंवा १०० वर्षांचे आयुष्‍य असो, ‘संतुलन’ महत्त्वाचे ! एकदा का वात, पित्त आणि कफ समजले की, आयुर्वेद समजला ! आयुर्वेद एवढा सोपा आहे.

तापामध्‍ये काही वेळेला भूक खूप लागते. अशा वेळी ‘पचनशक्‍ती चांगली आहे’, असे समजावे का ?

‘काहींना ताप आलेला असतांनाही पुष्‍कळ भूक लागते. अशा वेळी ‘भूक चांगली लागली, म्‍हणजे आपला अग्‍नी (पचनशक्‍ती) चांगला आहे’, असे समजू नये. अग्‍नी मंद असतांनासुद्धा भूक लागू शकते. हे कसे, ते समजण्‍यासाठी एक व्‍यावहारिक उदाहरण पाहू…..

वणी (जिल्हा यवतमाळ) येथील श्री. लहू खामणकर यांना आयुर्वेदाविषयी आलेल्या अनुभूती

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद !’ या सदरात ‘चहा पिणे आरोग्यास घातक आहे’, असे सांगितले होते. त्यानुसार मी चहा पिणे बंद करण्याचा निश्चय केला.

तापामध्‍ये दही का खाऊ नये ?

दह्यामध्‍ये प्रथिने जास्‍त असतात. रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्‍यासाठी प्रथिनांचे सेवन आवश्‍यक असते’, या अर्धसत्‍य ज्ञानामुळे कोरोनाच्‍या काळात ताप असतांना अनेकांना दही खाण्‍याचा सल्ला दिला गेला. या दह्यामुळे पचनशक्‍ती मंदावून फुप्‍फुसांमध्‍ये पाणी होऊन रुग्‍ण अत्‍यवस्‍थ झाल्‍याची अनेक उदाहरणे वैद्यांच्‍या लक्षात आली.

‘ताप असतांना हलका आहार घ्‍यावा’, असे का सांगतात ?

‘आपल्‍याला चूल पेटवायची असेल, तर आधी चुलीतील राख काढून चूल स्‍वच्‍छ करावी लागते. त्‍यानंतर आपण एखादा कागद ठेवून आगपेटीच्‍या काडीने तो पेटवतो. कागद लगेच पेट घेतो.

स्‍त्रियांनी रजोनिवृत्तीच्‍या काळासाठी स्‍वतःला कसे सिद्ध ठेवावे ?

या काळात, शरिरात होणार्‍या या पालटांविषयी आपल्‍याला कल्‍पना असल्‍यास आपण त्‍या पालटांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्‍ट्या सिद्ध होऊ शकतो. पर्यायाने स्‍त्रिया रजोनिवृत्तीच्‍या काळातही स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित राखू शकतात !

कर्करोगाच्‍या रुग्‍णांना आयुर्वेदाचे उपचार दिल्‍याचा लाभ होतो !

७ नोव्‍हेंबर या दिवशी ‘राष्‍ट्रीय कर्करोग जागृतीदिन’ झाला. त्‍या निमित्ताने…

तापामध्‍ये औषधी पाणी

‘१ लिटर पाण्‍यात अर्धा चमचा सनातन मुस्‍ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळावे. हे उकळलेले पाणी गाळून थर्मासमध्‍ये भरून ठेवावे.

ताप आलेला असतांना काय खावे ?

पेज प्‍यायल्‍याने लगेच तरतरी येते. १ – २ वेळा पेज प्‍यायल्‍याने थकवा निघून जातो आणि ताप लवकर बरा होण्‍यास साहाय्‍य होते.

ताप आलेला असतांना पचायला जड असे पदार्थ खाणे टाळावे

‘सध्‍या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्‍ये शरिराची पचनशक्‍ती क्षीण झालेली असते. गव्‍हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्‍कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्‍या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्‍यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’