उष्णतेच्या लाटेमध्ये सर्वांनी घ्यावयाची काळजी

येणारे ५ दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट असण्याचा अंदाज आहे. सगळ्यांनीच; पण विशेषत: ‘किडनी फेल्युअर’ (मूत्रपिंड निकामी होणे), उच्च किंवा कमी रक्तदाब असलेले रुग्ण आणि लहान मुले यांनी या काळात शक्य तितके घराबाहेर पडणे टाळावे. अगदीच अशक्य असल्यास लांबचे प्रवास टाळा. ‘डिहायड्रेशन’ (निर्जलीकरण) होऊ नये, याची काळजी घ्या.

वैद्य परीक्षित शेवडे

आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने लाह्याचे पाणी, धने-जिरे पाणी यांचा वापर करा. उलटी, जुलाब अशी लक्षणे दिसल्यास किंवा ताप आल्यास तात्काळ आपल्या वैद्यांना भेटा. घरगुती उपाय करत बसू नका. रक्त पातळ ठेवण्यासाठी किंवा रक्तदाब, ‘अल्झायमर्स’ (स्मरणशक्ती न्यून होणे किंवा विसरणे), ‘पार्किन्सन’ (मज्जासंस्थेशी संबंधित विकार) यांसाठी पाश्चात्त्य वैद्यकांची गोळी किंवा औषधे घेणार्‍या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (३.४.२०२४)