वसंत ऋतूत काय खावे ? आणि काय खाऊ नये ?

वैद्या स्वराली शेंड्ये

१. कालावधी

मार्च आणि एप्रिल (वातावरण लक्षणांप्रमाणे थोडे पुढे मागे) या कालावधीत सूर्याच्या उष्णतेने थंडीत गोठलेला कफ बाहेर यायला प्रारंभ होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे आजार बळावतात.

२. काय खावे ?

जुने धान्य, कडधान्ये, कुळीथ, मूग, मुगाचे वरण, कोमट पाणी, आले, लसूण, मध पाणी, पचायला हलके, कोरडे आणि उष्ण गुणांचे पदार्थ, विविध लाह्या, फळभाज्या, चटणी, सूप, पेज, पातळ भात मेतकूट, मुगाचे कढण, भाजलेले मांस, सुंठ, थालीपीठ, कुळीथ पिठले, भाकरी इत्यादी.

३. काय टाळावे ?

नवीन तांदूळ, नवीन धान्य, दही, चीज, रात्री ताक, सतत भात, गार पाणी, पास्ता, बेकरी पदार्थ, मैदा, मासे, समुद्री पदार्थ (ऑयस्टर – शिंपल्यातील एक खाण्यायोग्य प्राणी, शिंपले इत्यादी), गोड पदार्थ, थंड पदार्थ, सतत फळे, शीतकपाटातील (‘फ्रीज’चे) पाणी, वातानुकूलित यंत्राचा तीव्र थंडावा, तेलकट पदार्थ.

४. तेलाद्वारे अभ्यंग, उटणे लावणे, वमन करणे आदी पंचकर्म करावे.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.

(वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांच्या फेसबुकवरून साभार)