सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
अंघोळीच्या वेळी डोक्यावर गरम पाणी घेतल्याने केसांच्या मुळांची शक्ती न्यून होते. यामुळे केस गळू लागतात.
‘प्रतिदिन सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी, तसेच दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर विड्याचे १ पान चावून खावे. (पान खाण्यापूर्वी त्याचा देठ आणि टोक काढून टाकावे.) यामुळे अंगातील जडपणा न्यून होतो.
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक विचार जीवनमूल्य आहेत. ती जीवनात अंगीकारून मनुष्यजातीचा सामूहिक विकास होऊ शकतो. हाच ‘सर्वे भवन्तु सुखिनः ।’, म्हणजे ‘सर्व जण सुखी होवोत’ यातील भाव आहे. अनादि काळापासून आलेली ही हिंदु संस्कृती सतत प्रवाहित आहे.
‘काही जण पुष्कळ जोरजोरात ब्रशने दात घासतात. असे करू नये. जोरजोराने दात घासल्याने दातांचे बाहेरचे आवरण (याला इंग्रजीत ‘एनॅमल’ म्हणतात) निघून जाण्याची शक्यता असते. हे आवरण निघून गेल्यास दात दुखणे, शिवशिवणे, किडणे इत्यादी त्रास चालू होतात.
‘व्यायामाने ‘स्थैर्य (शारीरिक आणि मानसिक)’ आणि ‘दुःखसहिष्णुता (दुःख सहन करण्याची क्षमता)’ निर्माण होते’, असे सहस्रावधी वर्षांपूर्वी आयुर्वेदाच्या चरकसंहितेत सांगितले आहे.
व्यायाम रजोगुणप्रधान कृती आहे. त्यामुळे तो सकाळी सूर्याेदय झाल्यावर करावा.
‘व्यायाम करत असतांना स्वतःच्या शरिराची कार्यक्षमता आधीच्या तुलनेत वाढत आहे ना’, याकडे ठराविक कालावधीने लक्ष द्यायला हवे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी नियमित प्रयत्न आवश्यक
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !