‘डोक्यावर गरम पाणी घेणे’ हे केस गळण्यामागील एक कारण

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२३

वैद्य मेघराज पराडकर

‘अंघोळीच्या वेळी डोक्यावर गरम पाणी घेतल्याने केसांच्या मुळांची शक्ती न्यून होते. यामुळे केस गळू लागतात. केस गळणे टाळण्यासाठी डोक्यावर गरम पाणी न घेता अगदी कोमट पाणी घ्यावे. मानेच्या खालच्या भागासाठी गरम पाणी शक्तीवर्धक असल्याने अंघोळीच्या वेळी खांद्यावरून गरम पाणी घेण्यास आडकाठी नाही.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)