दात हळूवारपणे घासावेत

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२१

वैद्य मेघराज पराडकर

‘काही जण पुष्कळ जोरजोरात ब्रशने दात घासतात. असे करू नये. जोरजोराने दात घासल्याने दातांचे बाहेरचे आवरण (याला इंग्रजीत ‘एनॅमल’ म्हणतात) निघून जाण्याची शक्यता असते. हे आवरण निघून गेल्यास दात दुखणे, शिवशिवणे, किडणे इत्यादी त्रास चालू होतात. दातांच्या फटींमध्ये अडकलेले अन्नकण निघून जाण्यासाठी ब्रशच्या साहाय्याने हळूवारपणे दात घासावेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)

लेखमालिका आचरणात आणण्यास येणार्‍या अडचणी [email protected] या ई-मेल पत्त्यावर कळवाव्यात.