निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२०
‘व्यायामाने ‘स्थैर्य (शारीरिक आणि मानसिक)’ आणि ‘दुःखसहिष्णुता (दुःख सहन करण्याची क्षमता)’ निर्माण होते’, असे सहस्रावधी वर्षांपूर्वी आयुर्वेदाच्या चरकसंहितेत सांगितले आहे. ‘मेंदूमध्ये ‘डोपामीन’ या संप्रेरकाचे (हॉर्माेनचे) प्रमाण योग्य असेल, तर माणूस तणावमुक्त आणि आनंदी रहातो. व्यायामाने ‘डोपामीन’ वाढत असल्याने नियमित व्यायाम केल्याने मन मानसिक तणाव सहन करण्यास सक्षम, तसेच आनंदी रहाते’, असे आधुनिक वैद्यकशास्त्राचेही संशोधन आहे. व्यायामाचा हा लाभ अनुभवण्यासाठी एकही दिवस खंड पडू न देता प्रतिदिन व्यायाम करणे आवश्यक आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)
लेखमालिका आचरणात आणण्यास येणार्या अडचणी [email protected] या ई-मेल पत्त्यावर कळवाव्यात. |