‘जैश-ए-महंमद’चा आतंकवादी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणार्‍या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या रईस शेख (वय २८ वर्षे) याचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

मुंबई साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना गुजरात येथे अटक !

गुजरातमधील आतंकवादविरोधी पथकाने वर्ष १९९३ मधील साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना अटक केली आहे. आतंकवादविरोधी पथकाडून या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे वृत्त ‘ए.एन्.आय्.’ वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे.

देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शिक्षण संस्थेतून बांगलादेशी तरुणाला अटक

जवळपास ७ वर्षे हा तरुण भारतात घुसखोरी करून रहात असतांना सुरक्षायंत्रणांना याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद आहे !

अरबी समुद्रात पाकिस्तानी नौकेतून २८० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात ‘अल हज’ ही पाकिस्तानी नौका पकडण्यात आली.

‘अल सुफा’ संघटनेचे धागेदोरे संभाजीनगर येथेही असल्याचा मध्यप्रदेश ‘ए.टी.एस्.’ला संशय !

जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात पुढे आले आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना नागरिकत्व अन् जामीन मिळवून देणार्‍या धर्मांधाला अटक

मूळचा म्यानमारच्या असलेल्या धर्मांधाने भारतीय नागरिकत्व मिळवले ! घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यामागे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारीही उत्तरदायी आहेत !

‘जमियत’ची चौकशी हवी !

जमियत आणि पीएफआय यांच्या कृतीतून भारतातील शासनव्यवस्था उद्ध्वस्त करून इस्लामी व्यवस्था स्थापण्याचे छुपे मनसुबे उघड होतात. भारतीय समाज ‘या संघटनांवर कारवाई होईल’, या आशेवर असाहाय्य होऊन पहात आहे, तेव्हा मोदी सरकारने भारतियांचा आक्रोश लक्षात घेऊन जमियतवर कारवाई करून देश सुरक्षित करावा, ही अपेक्षा !

अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला पकडले !

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या येथील घरात एका अज्ञात तरुणाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या तरुणाने डोवाल यांच्या घरात चारचाकी गाडी घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र येथील सुरक्षा कर्मचार्‍यांनी योग्य वेळी या व्यक्तीला थांबवून कह्यात घेतले.

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

आजवर कुणीही हिंदूंना आतंकवादी म्हटले नाही; मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादींनी भगवा आतंकवाद अन् हिंदु आतंकवादी असे लेबल लावले. आता ते सर्वजण देश आणि हिंदुविरोधी होते, हे समोर येऊ लागले आहे.

साक्षीदाराने साक्ष न दिल्यास त्याच्या कुटुंबाला इजा पोचवण्याची ‘ए.टी.एस्.’ने दिली होती धमकी !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील साक्षीदाराचे आतंकवादविरोधी पथकावरच आरोप ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख करण्यासाठी होता साक्षीदारावर दबाव !