श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सर्वव्यापक गुरुतत्त्वाशी असलेली एकरूपता !

‘सद्गुरु गाडगीळकाकूंचे बोलणे आणि आचरण प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रमाणे सहज अन् आनंददायी असते. त्यांची व्यष्टी आणि समष्टी प्रकृती असून त्या प.पू. भक्तराज महाराज यांच्यातील गुरुतत्त्वाशी एकरूप होत आहेत. सद्गुरु बिंदाताईंचे बोलणे आणि आचरण परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणे परिपूर्ण अन् चैतन्यदायी असते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

साधना करतांना सारखे भावावस्थेत राहिलो, तर गुरु आपल्याला आयुष्यात काहीही अल्प पडू देत नाही.

अमेरिकेतील सौ. राजलक्ष्मी जेरे यांना स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात झालेले दर्शन !

अमेरिकेतील सौ. राजलक्ष्मी जेरे यांना स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात झालेले दर्शन आणि आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.

‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचा सनातनच्या तीन गुरूंशी संबंध असल्याचे साधिकेला जाणवणे

आज सकाळपासूनच मला श्री दत्तगुरूंचे स्मरण होऊन त्यांची भजने आठवत होती. सकाळी सेवा झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी चेन्नई येथील पार्थसारथी मंदिरात घेतलेले दर्शन आणि त्यांना आलेली अनुभूती

नवीन लोकांना भेटून ‘त्यांना साधना सांगणे, आपले कार्य सांगणे’, हे आपले साधनेतील कर्म आहे. त्या लोकांनी साधना करणे, न करणे हे त्यांचे कर्म आहे; पण आपण साधना सांगण्याचे आपले कर्म मनोभावे पूर्ण केल्याने त्यांच्या चित्तावर आपण सांगितलेल्या साधनेच्या गोष्टींचा संस्कार होतो.

सप्तर्षींनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणे

सप्तर्षींनी सांगितल्यानुसार आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यात आले. हे उपाय करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिन्ही पुरचुंड्यांच्या ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत.

जयपूर, राजस्थान येथील शिवभक्त पू. वीरेंद्र सोनी (वय ८७ वर्षे) यांचा देहत्याग

पू. वीरेंद्र सोनी हे घरी राहूनच भाव-भक्तीने साधना करत. त्यांनी धर्मग्रंथांचे वाचन करून त्यांना आतून ईश्वराकडून मिळणाऱ्या ज्ञानाच्या आधारे लिखाण केले आहे. त्यांची भगवान शिवावर अचल श्रद्धा होती.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘शिकण्याची प्रक्रिया, म्हणजे काय ?’, ते शिकता आले पाहिजे. ज्या शिकण्यामधून आपला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तीनही स्तरांवर सर्वांगीण विकास होऊन आपली वाटचाल चिरंतन आनंदाकडे होते, तेच खरे शिकणे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि भाव असलेले सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी (वय ७३ वर्षे) !

वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. विनायक शानभाग यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त असलेली आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी अक्षय्य तृतीया !

अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात.