व्हिसा संपलेल्या एका रशियन नागरिकाला परत पाठवले
प्रयागराज – महाकुंभक्षेत्री पोलिसांनी पाच विदेशी नागरिकांची चौकशी केली. यामध्ये १ रशिया, १ जर्मनी आणि ३ बेलारूस येथील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांची कागदपत्रे पडताळली. या वेळी रशियाच्या नागरिकाचा व्हिसा संपूनही तो भारतात रहात असल्याचे उघड झाले. व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का होय. त्यामुळे पोलिसांनी त्याला परत पाठवले. अन्य चार जणांची कागदपत्रे वैध असल्याचे आढळून आले. पोलिसांना वरील चौघांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पोलीस स्थानिक नागरिकांसह विदेशी नागरिकांवरही लक्ष ठेवून आहेत.