अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणार्‍या शिक्षकाला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – वर्गात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणार्‍या ३८ वर्षीय शारीरिक शिक्षण विषय शिकवणार्‍या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी धावण्याचा सराव करत असताना आरोपी शिक्षकाने वर्गाचा दरवाजा बंद करून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशांना बडतर्फच करायला हवे !