शरिरातील विविध वेगांना किंवा संवेदनांना रोखणे म्हणजे आजारांना निमंत्रणच !
महर्षि वागभट्ट यांनी ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात ‘रोगानुत्पादनीय’ हा अध्याय सांगितला आहे. यामध्ये रोग होऊ नये, यासाठी महत्त्वाची काळजी, म्हणजे आपल्या शरिराला जाणवणार्या संवेदना रोखू नये. यालाच ‘वेग’ असे नाव महर्षि वागभट्ट यांनी दिलेले आहे.