अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !

गुरु या शब्दात २ अक्षरे आहेत. ‘गुकार’, म्हणजे अंधकार आणि ‘रुकार’ म्हणजे तेज. अंधकाराचा नाश करणारे तेज. जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते. सद्गुरु अज्ञानरुपी अंधाराचा नाश करतात. दृश्य काळोखापेक्षा, अज्ञानाचा काळोख प्रचंड असतो. तो निबिड असतो आणि सामर्थ्यशाली असतो. असत्याला सत्याचे रूप देणारा असतो. अज्ञानरूपी अंधकाराचे वैशिष्ट्य असे की, तो अंधार वाटत नाही. तो उजेड वाटतो. ‘गु’ आणि ‘रु’ च्या समन्वयातून प्रकट होणारे तेज अज्ञानरूपी काळोखाचा कणही उरू देत नाही.’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)