ससून रुग्णालयात लागलेल्या आगीचा धोका टळला !

वॉर्डमधील रुग्ण सुखरूप असून रुग्णालयातील आग पूर्णपणे विझली आहे. यामध्ये कुणी घायाळ झाले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही. शौचालयात अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खडकवासला (पुणे) येथे ‘ऑक्सिजन थीम पार्क’चे भूमीपूजन !

खडकवासला धरणासमोरील पाटबंधारे विभागाच्या ११ एकर जागेमध्ये ‘ऑक्सिजन थीम पार्क’चे भूमीपूजन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘पर्यटन विकास योजने’तंर्गत हे काम होणार आहे.

पालक्काड (केरळ) येथील ‘संस्कार’ या ‘चिन्मय मिशन’च्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन !

‘चिन्मय मिशन’च्या वतीने ‘संस्कार’ हा कार्यक्रम स्वामी चिन्मयानंद यांच्या १०८ व्या जन्मदिनाच्या वतीने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पालक्काड येथील महानगरपालिकेच्या स्टेडियममध्ये पार पडला.

आपण जर धर्मपालन केले, तर धर्म आपले रक्षण करतो ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, करवीर पीठ

‘श्रीरामनिकेतन’ येथे भावपूर्ण वातावरणात कीर्तन शताब्दी महोत्सवास प्रारंभ !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात नागपूरच्या उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांना निवेदन !

या दिवशी होणार्‍या मेजवान्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन, महिलांवरील अत्याचार आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झालेली दिसते.

एकल महिला प्रश्नांवर ९ मासांत समितीची एकही बैठक घेतली नसल्याचा आरोप !

जिल्हा परिषद प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना याविषयी विचारले असता, एकल महिलांच्या प्रश्नांवर काम चालू आहे.

पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला भीषण आग !

या घटनेत रेल्वेचे आणखी २ डब्बे जळले. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. रेल्वे अधिकारी या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

८० कलाकारांच्या भव्यदिव्य ‘शिवबा’ महानाट्यातून रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

संत एकनाथांच्या‘दार उघड बया दार उघड बया’ या भारुडापासून या महानाट्याला प्रारंभ होतो. तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडत हे कथानक पुढे सरकते.

देवाला मनापासून शरण गेलो की तो सर्वकाही आपल्याला देतो ! – ह.भ.प. विनायक आगरकर

भगवंताच्या चरणकमलाशी सुखाची प्राप्ती आहे. क्षमाशीलतेने भगवंताच्या चरणावर डोके ठेवले, तर त्या दर्शनाने त्यातील ऊर्जा आपल्याला मिळते.

सामाजिक कार्यकर्ते सुनील बेंडखळे ‘कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित

कोकणातील जाखडी, नमन, भजन आदी लोककलांच्या सादरीकरणातून मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्हीची अतिशय उत्तम सांगड घालणारे हे लोकनाट्य रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.