हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही पैसे घेतात ! – अनुज साहनी, अभिनेता

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार पार्ट्या, मोठ्या उद्योगपतींकडील विवाह आदी ठिकाणी दिसतात. कुणाचा मृत्यू झाला असेल, तर त्यांचा अंत्यसंस्कार किंवा प्रार्थना सभा यांनाही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित रहातात. अंत्यसंस्काराला, तसेच तेराव्याच्या दिवशी जाण्यासाठीही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार पैसे घेतात, असे वक्तव्य अभिनेता अनुज साहनी यांनी ‘बिग स्मॉल टॉक नाऊ’ या कार्यक्रमात केले. (हे सत्य असेल, तर हिंदी चित्रपटसृष्टीने किती खालची पातळी गाठली आहे, हे दिसून येते ! – संपादक)