आरोपींमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्याचा समावेश !
पुणे – हडपसर येथील जे.एस्.पी.एम्. महाविद्यालयाजवळील १० गुंठे भूमीची बनावट कागदपत्रे सिद्ध करून आर्थिक लाभासाठी विक्री केली. या प्रकरणी राष्ट्रीय काँग्रेसचा नेता इम्रान (कट्टा) शेख याला वानवडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भूमीमालक विना संघवी यांच्याकडून विजय संघवी यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. इम्रानचे साथीदार राज शेख आणि बक्षू भाई अद्यापही पसार आहेत. आरोपी अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत होते; परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोपींतील राज शेख हा सराईत भू माफिया आहे. त्याने अनेक लोकांची जागेच्या व्यवहारांतून आर्थिक फसवणूक केली.
तक्रारदार संघवी यांनी वर्ष २००५ मध्ये राजकुमार कोयाळीकर आणि चंद्रकांत घुले यांच्याकडून भूमी खरेदी केली होती. भूमीवर संघवी यांनी तटभिंतही बांधली आहे. मिळकतींवर काही लोकांनी विनाअनुमती पत्रा शेड उभारल्याचे लक्षात आले. तक्रारदारांनी त्याविषयी विचारणा केली असता, आरोपींनी बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमीची विक्री केल्याचे लक्षात आले.
संपादकीय भूमिका :फसवणूक करणार्या धर्मांधांकडून ही रक्कम वसूल करून घ्यायला हवी ! |