आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात १ सहस्र ९६२ अग्नीशस्त्रे (बंदुका) शासनाधीन !

अनुमतीप्राप्त ३ सहस्र २२८ अग्नीशस्त्रांपैकी १ सहस्र ९६२ अग्नीशस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात शासनाधीन करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

पुणे येथे १५ वर्षांपेक्षा जुनी लाखो वाहने पुनर्नोंदणी न करता अवैधरित्या रस्त्यावरून धावत आहेत !

कायद्याचा धाक नसणारी जनता निर्माण करणारे आजपर्यंतचे शासनकर्ते ! आतातरी प्रशासनाने कायद्यानुसार वागण्याची इच्छाशक्ती वाढवणे आवश्यक आहे !

छत्रपती संभाजीनगर येथे शिंप्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू !

येथील छावणी परिसरात असणार्‍या शिंप्याच्या दुकानाला ३ एप्रिलला पहाटे ४ वाजता भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणी बारामतीत विस्तार अधिकार्‍यावर गुन्हा नोंद !

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सी व्हिजिल ॲप’वर आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करता विनाअनुमती मुख्यालय सोडणे, उपविभागीय अधिकार्‍यांनी विचारणा केल्यावर त्यांना उर्मट उत्तर दिल्याची घटना बारामतीत घडली आहे.

अत्यंत दयनीय झालेली हिंदूंची स्थिती !

‘धर्मशिक्षणाच्या अभावी आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी निर्माण केलेल्या विकल्पांमुळे हिंदूंना हिंदु धर्माचे अद्वितीयत्व ज्ञात नसल्यामुळे त्यांना धर्माभिमान नाही; म्हणून त्यांची स्थिती जगातील सर्वधर्मियांत अत्यंत दयनीय झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देशातील गोहत्या कधी थांबणार ?

देशात सध्या केवळ १७ कोटी गायी शेष आहेत. ज्या पद्धतीने गोहत्या चालू आहेत, त्या थांबवल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर आपल्याला गायी चित्रात पहाव्या लागतील..

संपादकीय : निवडणुकीत आश्वासने नकोत ! 

निवडणुकीच्या काळात अवास्तव आश्वासने देणार्‍या उमेदवारांवर कठोर कारवाई करणारा कायदा बनवणे आवश्यक !

ज्ञान होण्याआधी आणि ज्ञानाच्या नंतर व्यवहार करावा कि नाही ?

ज्ञान होण्याआधी व्यवहार खोटा म्हणणे धाडसाचे आहे. शास्त्र, नीती, देशभक्ती यांचा त्याग करणे, हा महाअपराध आहे; पण परमात्मज्ञानाच्या नंतर व्यवहाराला कवटाळणे वेडेपणाचे होईल. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

सध्या चालू असलेल्या वसंत ऋतूत सब्जा कधीतरी आणि अल्प मात्रेत सेवन करणे योग्य !

सध्या ऊन वाढत असल्याने शरिराला थंडावा म्हणून कित्येक जण सब्जा खात आहेत. सध्या वसंत ऋतू चालू आहे. हा निसर्गतः कफ वाढण्याचा काळ असल्याने नियमितपणे सब्जा खाणार्‍यांना सर्दी-खोकल्याचे त्रास बळावू शकतात.