वांद्रे-कुर्ला भूमीगत मेट्रो स्थानकात आग !

येथील वांद्रे-कुर्ला मेट्रो भूमीगत स्थानकात १५ नोव्हेंबर या दिवशी १ वाजता आग लागली. वांद्रे ते आरे वसाहत हा पहिला टप्पा नुकताच चालू करण्यात आला होता. भूमीगत मेट्रो स्थानकातील तळघरात ठेवलेले लाकडी साहित्य आणि फर्निचर यांना ही आग लागली.

विमा प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास शेतकर्‍यांनी तक्रार द्यावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळते; मात्र फळपिकांचे अपेक्षित उत्पन्न न झाल्यास हानीही मोठी होते.

पुणे शहरात रक्ताचा तुटवडा !

सुटी आणि निवडणूक कालावधी पूर्वनियोजित असतांनाही रक्त पिशव्यांची सोय न करणारे रक्तपेढीवाले असंवेदनशीलच होत !

शेळगाव (जिल्हा सोलापूर) येथे दिंडीत टेंपो शिरल्याने दोन वारकर्‍यांचा मृत्यू !

बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे कार्तिकी एकादशीची वारी पूर्ण करून गावात परतणार्‍या वारकर्‍यांच्या दिंडीत भरधाव वेगाने जाणारा टेंपो शिरल्याने झालेल्या अपघातात २ वारकर्‍यांचा मृत्यू झाला असून ६ वारकरी गंभीर घायाळ झाले आहेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा न देणार्‍या महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध रहावे ! – नरेंद्र मोदी

१४ नोव्हेंबर या दिवशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा दादरमधील शिवाजी पार्क येथे पार पडली.

महाराष्ट्रात प्रथमच सव्वा लाख तुलसी अर्चना सोहळा पार पडला !

१६१ दांपत्यांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेतला होता. तुलसी पूजन आणि तुलसी अर्चन चालू असतांना पं. विजय दधीच महाराज यांच्या अमृतवाणीमधून होणारे मंत्रोच्चार वातावरण भारावून टाकणारे ठरले.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या जिल्हा संयोजकांच्या शिबिराचा गोव्यात शुभारंभ !

हिंदूसंघटन आणि हिंदूंची इकोसिस्टम (यंत्रणा) सिद्ध करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न झाले पाहिजे, यावर शिबिरार्थी हिंदुत्वनिष्ठांचे दिशादर्शन करण्यात येत आहे.

सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे पाटीदार समाजातील ‘महिलांसाठी साधना आणि स्वसंरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन पार पडले !

‘दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश पाटीदार समाज’, यांच्या अंतर्गत ‘सावंतवाडी पाटीदार समाज’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पाटीदार समाज सभागृहात एक दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा करण्यात आला संकल्प !

हिंदुत्वनिष्ठ उपक्रमांना चालना देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेले ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात पार पडले. या अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा….

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबला लक्ष्य करण्याचा बिष्णोई टोळीचा कट

देहलीत वर्ष २०२२ मध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला तिहार कारागृहात अटकेत आहे.