१. देहधारणा हळूहळू नष्ट होऊन देहाने प्रारब्धानुसार प्रारब्ध भोगणे आणि देहप्रारब्धाचा मनावरील परिणाम हळूहळू न्यून होणे
‘माझ्या मनात विचार आला, ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, असे- प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटले आहे. ‘मन प्रकृतीशी चिकटलेले असते. डोळे हे त्याचे माध्यम आहेत. मनाला अंतःचक्षू आणि भावचक्षू यांनी चैतन्याशी म्हणजे ईश्वराशी जोडले की, ते बाह्य प्रकृतीपासून निर्लिप्त होऊन परब्रह्म स्वरूपात विलीन होऊ लागते. देहधारणेतून हे सर्व घडत असते. यातून देहधारणाही हळूहळू नष्ट होऊन प्रारब्धानुसार देह देहप्रारब्ध भोगतो आणि त्याचा मनावरील परिणाम हळूहळू न्यून होऊ लागतो.’
२. सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी करावयाचे प्रयत्न
दृश्य जगतातील लक्ष काढून अदृश्य जगतात ध्यान लागले की, अदृश्य परमात्म्याचे दर्शन होऊ लागते. त्यासाठी पुढील प्रयत्न करू शकतो, ‘परमात्म्याच्या दर्शनासाठी आंतरिक इंद्रियाद्वारे पहाण्याचा प्रयत्न करावा. आंतरिक इंद्रियातून अंतरात्म्याकडे जाण्यासाठी प्रयत्न करावा. बाह्यमनातून अंतर्मनाकडे आणि अंतर्मुखतेतून अंतरात्म्याकडे जावे. यासाठी देवाला शरण जाऊन दृष्टी आत वळवण्याचा प्रयत्न करावा. देहभावातून देवभाव, देवभावातून ब्राह्मभाव आणि ब्राह्मभावातून सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन अन् अनुभूती घ्यावी.
३. भावजागृतीचे प्रयत्न करून नामजपादी उपाय केल्यावर नामजप परिणामकारक होणे
रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात श्री गुरुपरंपरेतील पाच छायाचित्रे (१. श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद, २. श्री अनंतानंद साईश, ३. प.पू. भक्तराज महाराज, ४. प.पू. रामानंद महाराज, ५. शिष्य डॉ. जयंत आठवले) आहेत. त्या छायाचित्रातील प्रथम प.पू. चंद्रशेखरानंदजी प्रत्यक्ष माझ्यासमोर उभे असून मी त्यांच्या चरणी नतमस्तक झालो. मी गुरुपरंपरेतील प्रत्येक छायाचित्रासमोर उभा आहे आणि ते छायाचित्र नसून गुरु प्रत्यक्ष उभे आहेत’, असा भाव ठेवून मी क्रमाने सर्वांना गुरुचरणी साष्टांग नमस्कार केला. नमस्कार केल्यावर माझ्या मनाला पुष्कळ आनंद मिळाला. माझे शरीर हलके झाले. त्यानंतर माझा नामजपही एकाग्रतेने होऊ लागला. ‘भावजागृतीचे प्रयत्न करून नामजपादी उपाय केल्यावर नामजप परिणामकारक होतो’, हे मला शिकायला मिळाले.
मला या सर्व अनुभूती आणि ज्ञान दिल्याबद्दल श्री गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४५ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र, मथुरा (२८.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |