‘माझ्याकडून एक चूक झाली होती. तेव्हा ‘माझ्याच स्वभावदोषामुळे माझ्याकडून चूक झाली आहे आणि ती चूक सुधारली पाहिजे’, असे मला वाटले. देवाने त्यावर मला प्रायश्चित घेण्यास आणि ती ज्या स्वभावदोषामुळे झाली, त्यावर मनाला स्वयंसूचना देण्यास सुचवले. त्यानंतर मी ८ दिवस प्रायश्चित घेतले आणि एक मास स्वयंसूचना सत्रे केली. त्यामुळे त्या स्वभावदोषामुळे होणारी चूक सुधारतांना दिसत होती. यातून ‘वेळेत प्रायश्चित घेणे आणि मनाला स्वयंसूचना देणे किती महत्वाचे आहे ?’, हे मला शिकायला मिळाले. ‘स्वयंसूचनेमुळेच आपले स्वभावदोष लवकर अल्प होऊ शकतात आणि आपण लवकर पुढे जाऊ शकतो’, असे मला जाणवले. या मार्गापेक्षा अजून दुसरा सोपा मार्ग असूच शकत नाही. गुरुदेवांनी साधनेचे प्रयत्न सोपे करून दिले आहेत, त्यासाठी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी अल्पच आहे.’ – कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा. (६.१.२०२३)