भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भाऊबिजेच्या दिनी आपल्या बहिणीला वरील अशाश्वत भेटवस्तू देण्यापेक्षा चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणार्‍या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. त्याचप्रमाणे तिला ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकाची वाचिकाही बनवता येईल. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्तिक ठरेल.

बेकायदेशीर बांधकामे हटवण्याची मागणी का करावी लागते ?

उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे बेकायदेशीर मशीद हटवण्याची मागणी करत हिंदु संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या वेळी झालेल्या दगडफेकीनंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यात २७ जण घायाळ झाले.

बाल न्यायालयाने दोषीला २० वर्षांचा कारावास आणि साडेनऊ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली

३० ऑक्टोबर २०१५ या दिवशी आशेवाडा, बेतोडा येथे ही घटना घडली होती आणि त्या वेळी संशयिताचे वय १९ वर्षे होते.