श्री गणेशरूप परिचय !
‘श्री गजानन’ हा आपल्या चारही वेदांचा समावेशक शब्द आहे. जसे ‘ऋग्’मधील ‘ग’, ‘युज’मधील ‘ज’ आणि सामन् आणि अयर्वन् मधील ‘न’, ‘न’ मिळूनच ‘गजानन’ शब्दाची घडण झालेली आहे.
‘श्री गजानन’ हा आपल्या चारही वेदांचा समावेशक शब्द आहे. जसे ‘ऋग्’मधील ‘ग’, ‘युज’मधील ‘ज’ आणि सामन् आणि अयर्वन् मधील ‘न’, ‘न’ मिळूनच ‘गजानन’ शब्दाची घडण झालेली आहे.
संकटनाशासाठी कुणी श्री गणेशोपासनेची कास धरतो, तर कुणी मनोकामना पूर्तीसाठी, काही मनःशांतीसाठी किंवा विशिष्ट हेतू किंवा ईप्सित साध्य करण्यासाठी गणेशाची साधना करतात; मात्र साधकाच्या ठिकाणी चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठेची आवश्यकता असते.
‘श्री गणेशाचे कार्य शिवापासून आरंभ होते, म्हणजे ते शिवतत्त्वाशी संबंधित आहे. शिव म्हणजे शांती. श्री गणेश म्हणजे निवृत्ती प्रदान करणारी, आत्मशांतीला गती देणारी शक्तीरूप संवेदना, जी ज्ञानब्रह्म, शब्द-निःशब्द ब्रह्म, ब्रह्मस्वरूप आहे.
श्री गणेशाचा आदर्श समोर ठेवून आपणही हिंदु धर्मप्रसार करून सर्वांना धर्मज्ञान देऊया आणि साधनेने स्वतः सात्त्विक बनून इतरांना मंगलता प्रदान करूया. हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी वीरश्री जागृत ठेवूया.
एकदा स्वर्गातील देवदेवता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा करण्यास निघाले. गणपतीने आपल्या युक्तीचातुर्याने शास्त्राप्रमाणे आपले माता-पिता यांना ७ प्रदक्षिणा घालून सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि अग्रपूजेचा मान मिळवला.
‘सुमुखश्र्चेकदंतश्र्चय कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्र्च विकटो विघ्ननाशो गणधिपः ।।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि य पठेच्छ्णुयादपि ।।’
‘ॐ गँ गणपतये नमः’ हा नामजप गणेशोत्सवाच्या काळात अधिकाधिक करावा.
महाराष्ट्रात ‘अष्टविनायक’ ही गणेश क्षेत्रांची गणना लोकप्रिय असली, तरी पुराणात २१ गणेश क्षेत्रे सांगितली आहेत. महाराष्ट्रातील आठही स्थाने त्यात समाविष्ट आहेतच; परंतु २१ क्षेत्रांतील अष्टविनायकांपैकी आणखी काही स्थाने महाराष्ट्रातच आहेत आणि काही महाराष्ट्राबाहेर भारतात अन्य ठिकाणी आहेत.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आसपास अष्टविनायकांची मंदिरे आहेत. एका संतांनी अष्टविनायकांच्या मूर्तींच्या छायाचित्रांची सूक्ष्म-परीक्षणे केली. त्यांची परीक्षणे वाचतांना त्यांचे एक वैशिष्ट्य लक्षात आले…
हे बुद्धीदात्या आणि विघ्नहर्त्या श्री गणेशा, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आम्हाला बुद्धी अन् शक्ती दे. या कार्यात येणार्या संकटांचे निवारण कर !