महाराष्ट्रातील सिद्धटेक (जिल्हा अहिल्यानगर) येथील सिद्धिविनायक मूर्तीच्या छायाचित्राची एका संतांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

‘महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आसपास अष्टविनायकांची मंदिरे आहेत. एका संतांनी अष्टविनायकांच्या मूर्तींच्या छायाचित्रांची सूक्ष्म-परीक्षणे केली. त्यांची परीक्षणे वाचतांना त्यांचे एक वैशिष्ट्य लक्षात आले, ‘अष्टविनायकांतील प्रत्येक मूर्तीत त्यांना त्या त्या नावाशी संबंधित स्पंदने जाणवली आहेत. वास्तविक त्या संतांना अष्टविनायकांतील कोणत्याही मूर्तीच्या नावाचा अर्थ आणि इतिहास (आख्यायिका) यांविषयी काहीही ठाऊक नाही.  

मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की, सृष्टीच्या आरंभी जेव्हा श्रीविष्णु त्याच्या योगनिद्रेत होते, तेव्हा श्रीविष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवही याच कमळातून उदयास आला. ब्रह्माने विश्वाची निर्मिती आरंभ करताच विष्णूच्या कानातून मधु आणि कैटभ हे २ राक्षस निर्माण झाले. या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टीनिर्मितीच्या कार्यात अडथळा आणण्यास आरंभ केला. त्यामुळे साक्षात विष्णूला जागृत होणे भाग पडले. विनाशकारी दानवांसमवेत श्रीविष्णूने युद्ध केले. पाच सहस्र वर्षे युद्ध चालले, तरी श्री विष्णु त्या दैत्यांना मारू शकला नाही. त्यामुळे श्रीविष्णु भगवान शिवाकडे गेला. ‘युद्धारंभी तू श्री गणेशाचे स्तवन केले नाहीस; म्हणून तुला विजय मिळत नाही’, असे शंकराने सांगितले. तेव्हा श्री विष्णु एका पवित्र टेकडीवर आला. तेथे त्याने ‘गणेशाय नमः ।’ या षडाक्षर मंत्राने श्री गणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने विनायक (गणेश) प्रसन्न झाला. विनायकाच्या कृपेने श्रीविष्णूला सिद्धी प्राप्त झाली. मग त्याने मधु-कैटभांना ठार केले. विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला आणि ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली, त्या ठिकाणी श्रीविष्णूने एक मोठे मंदिर बांधले अन् त्यात गंडकी नदीतील शिलेची ‘विनायकाची मूर्ती’ म्हणून स्थापन केली. या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली; म्हणून या स्थानाला ‘सिद्धटेक’ असे म्हणतात आणि येथील विनायकाला ‘सिद्धिविनायक’ असे म्हणतात.

संतांना ‘सिद्धिविनायक’ मूर्तीची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. त्यांना सिद्धिविनायकाच्या मूर्तीत विष्णुतत्त्व दिसण्यामागचे कारण वरील कथेवरून लक्षात येते.’ – संकलक

सिद्धटेक (जिल्हा अहिल्यानगर) येथील सिद्धिविनायक 

एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारण : सनातनचे काही सद्गुरु, संत आणि साधक सूक्ष्मातील ज्ञान मिळवतात. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. साधक, संत आणि सद्गुरु या क्रमानुसार त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे साधक, संत आणि सद्गुरु यांनी शोधून काढलेल्या एखाद्या सूक्ष्मातील स्पंदनांच्या टक्केवारीत भेद असू शकतो.

३ अ. गणेशतत्त्व

३ अ १. गणेशतत्त्वाचे वलय सिद्धिविनायक मूर्तीच्या भोवती असणे

३ आ. विष्णुतत्त्व

३ आ १. विष्णुतत्त्वाचे चक्राकार वलय मूर्तीत आज्ञाचक्रस्थानी कार्यरत असणे : श्रीविष्णूने हे मंदिर बांधले असल्याने सिद्धिविनायकाच्या मूर्तीत विष्णुतत्त्व आहे.

३ आ २. विष्णुतत्त्वाचे कणरूपी वलय मूर्तीच्या भोवती कार्यरत असणे

३ इ. शक्ती

३ इ १. शक्तीचे वलय मूर्तीत कार्यरत असणे

३ ई. भाव

३ ई १. आध्यात्मिक भावाचे वलय मूर्तीत कार्यरत असणे (‘एका आख्यायिकेनुसार, ‘आरंभी श्रीविष्णूने बांधलेले हे मंदिर कालांतराने नष्ट झाले. पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला. तो गुराखी प्रतिदिन भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालत असे आणि आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवत असे. तेव्हा श्री गणेशाने त्याला सांगितले, ‘तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी कर.’ तेव्हा त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा चालू केली.’ या गुराख्यामध्ये भाव असल्याने एका संतांना मूर्तीत आध्यात्मिक भावाची स्पंदने जाणवली.’ – संकलक)

– एक संत (१६.५.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.