30नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
आज ३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी ‘दुर्गाष्टमी’ आहे. त्या निमित्ताने…
‘आश्विन शुक्ल ८, हा दिवस भारतात दुर्गाष्टमी म्हणून पाळण्यात येतो. जगात जेव्हा आसुरी वृत्ती प्रबळ होते, तेव्हा आदिशक्ती देवीरूपाने अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनतेचा विश्वास आहे. या विश्वव्यापक आदिमायेने अनेक अवतार घेतले असल्यामुळे तिला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. महिष नावाच्या असुराचा वध करणारी ‘महिषासुरमर्दिनी’, चंडमुंड राक्षसांना मारणारी ‘चामुंडा’, दुर्गम नावाच्या दैत्यांना मारणारी ‘दुर्गा’ इत्यादी देवीची रूपे दिसून येतात. याच देवीची महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, अशी तीन स्वरूपे आहेत. भारतियांची अशी श्रद्धा आहे की, याच आदिमायेने मत्स्यकूर्मादी दशावतार घेतले, श्रीरामाच्या रूपाने रावण-कुंभकर्णास मारले, श्रीकृष्णाच्या रूपाने कंस, शिशुपालादिकांचा नाश केला. बिभीषण, मारुति, अर्जुन या वीरभक्तांच्या अंगात या देवीनेच प्रवेश केला. व्यक्तीत किंवा समाजात दुर्गुण आणि दुर्व्यसने संचरली, कामक्रोधादिकांचे बंड माजले, म्हणजे हीच अव्यक्तातून प्रकट होऊन दुष्टांचे दमन अन् सुष्टांचे (सज्जनांचे) संरक्षण करते.
ही परमेश्वरी शक्तीच विश्वाचा उद्धार करते. महाराष्ट्रात ही माहूर, सप्तशृंगी (नाशिक), तुळजापूर, औंध (जिल्हा सातारा), कोल्हापूर या ठिकाणी प्रकट झाली असून महाराष्ट्राची ती कुलदेवता आहे. निंबाळकर, भोसले ही प्राचीन क्षत्रिय घराणी भवानीच्या उपासकांची आहेत. याच ‘जगदात्मा जगदिश्वरी’ला, ‘रामवरदायिनी माते’ला समर्थांनी शिवरायांसाठी प्रार्थना केली होती –
येकची मागणे आता । द्यावें तें मजकारणें ।
तुझा तूं वाढवी राजा । शीघ्र आम्हाचि देखता ।।
अर्थ : हे देवी, तू मला सर्व दिले आहेस; पण तरीही एक मागतो. शिवाजीराजांचे वैभव, राज्य लवकर आमच्या डोळ्यांदेखत वाढव.
या देवीचे स्वरूप त्यांनी असे वर्णन केले आहे –
प्रसन्नमुख सुंदरा । तुझेन हे वसुंधरा ।
अर्थ : हे वसुंधरे, तुझे मुख प्रसन्न आहे. तू सुंदर दिसत आहेस.
तुझेनि नांव रूप हो । तुझें दिसे स्वरूप हो ।
अर्थ : तुझे नाव घेताच तुझे स्वरूप डोळ्यांसमोर येते.
तुझेनि सर्व बोलणें । तुझेनि सर्व चालणें ।
तुझेनि योग धारणें । तुझेनि राजकारणें ।।
अर्थ : माझे बोलणे, चालणे, राजकारण हे सारे तुझ्यामुळेच आहे.
(साभार : ‘दिनविशेष’)