अभिनेत्री सनी लिओनी यांच्या ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्यातून श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान !

मुसलमान आणि अन्य धर्मीय यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर कायदा हातात घेतात. हिंदू मात्र वैध मार्गाने त्याला विरोध करतात. त्यामुळे कुणालाही हिंदूंचा धाक राहिलेला नाही. अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण करणे आवश्यक !

गीता प्रेसच्या स्थापनेपासून ९८ वर्षांमध्ये प्रथमच धार्मिक पुस्तकांची विक्रमी विक्री !

‘देव नाही’, ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्‍या साम्यवाद्यांना ही सणसणीत चपराक आहे !

भ्रष्टाचार आणि दारू विक्री यांची तक्रार करणार्‍या ‘माहिती अधिकार’ कार्यकर्त्याचे गुंडांनी हात अन् पाय तोडले !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती अशीच असणार, हे जनतेला आता ठाऊक झाले आहे. त्यामुळे अन्य राज्यांतून काँग्रेसला सत्ताच्युत करण्यात आले आहे.

गायीसंदर्भात बोलणे काही लोकांसाठी ‘गुन्हा’ असू शकतो; मात्र आमच्यासाठी ती माता आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी गोमातेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशासाठी गोहत्याबंदी करावी, गोहत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा करणारा कायदा करावा, तसेच भारत गोवंशांच्या मांसाचा मोठा निर्यातदार झाला आहे, हा कलंक दूर करावा, असे हिंदूंना वाटते !

सनातन संस्थेवरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

कोणत्याही पुराव्याविना सनातन संस्थेवर देशव्यापी बंदी घालण्याची छगन भुजबळ यांची मागणी ! हे म्हणजे ‘कुत्र्याला पिसाळलेला ठरवून त्याला ठार मारा’ या म्हणीप्रमाणे हिंदुविरोधी शक्ती सनातनला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो.

अबुझमाड (छत्तीसगड) येथे आदिवासींकडून धर्मांतराच्या विरोधात आंदोलन

धर्मांतराच्या विरोधात शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय असल्यामुळेच अशा प्रकारे आदिवासींनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे, हे लज्जास्पद !

अवैधरित्या वाळू उत्खनन करणार्‍यांवर कडक कारवाई करू ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

अवैध वाळू उत्खनन करणार्‍या लोकांनी अनेक ठिकाणी १०-१५ फुटांचे खोल खड्डे खणले असून यात पडून ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे होणारे अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होत नाहीत !

आयकर विभागाकडून चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या २५ ठिकाणी धाडी

आयकर विभागाने २२ डिसेंबर या दिवशी चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या देशभरातील २५ ठिकाणी धाडी घातल्या. करचुकवेगिरीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.

लुधियाना (पंजाब) येथील न्यायालयात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू !

लुधियाना येथील न्यायालय परिसरात स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. हा स्फोट न्यायालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील ९ क्रमांकाच्या न्यायालयात झाल्याचे सांगण्यात आले आहे

अमृतसर (पंजाब) येथे अज्ञातांकडून श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि चोरी

पंजाब येथील अजनाला भागामध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अज्ञातांनी पुजार्‍याला एका खोलीत बंद करून मंदिरातील देवतांच्या २ मूर्तींची तोडफोड केली आणि तेथील मौल्यवान दागिने अन् दुचाकी घेऊन पलायन केले.