गायीसंदर्भात बोलणे काही लोकांसाठी ‘गुन्हा’ असू शकतो; मात्र आमच्यासाठी ती माता आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी गोमातेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशासाठी गोहत्याबंदी करावी, गोहत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा करणारा कायदा करावा, तसेच भारत गोवंशांच्या मांसाचा मोठा निर्यातदार झाला आहे, हा कलंक दूर करावा, असे हिंदूंना वाटते !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – आपल्याकडे गायीच्या संदर्भात बोलणे म्हणजे काही लोकांना गुन्हा वाटतो. गाय हा काही लोकांसाठी गुन्हा असू शकतो, आमच्यासाठी गाय ही माता आहे, पूजनीय आहे. गायी आणि म्हशी यांची खिल्ली उडवणारे लोक हे विसरतात की, देशातील ८ कोटी कुटुंबांचा उदरनिर्वाह, अशाच पशुधनावर चालतो, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील कारखियांवामध्ये एका कार्यक्रमात केले.

‘बनास डेअरी’ची पायाभरणी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते येथे गुजरातच्या ‘बनासकांठा जिल्हा दूध उत्पादक संघ लिमिटेड’च्या ‘बनास डेअरी’ची पायाभरणी करण्यात आली.