सनातन संस्थेवरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केलेली भूमिका !

मुंबई – महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमक्यांचा सनातन संस्था तीव्र शब्दांत निषेध करते. या धमक्या देणार्‍या दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत; परंतु या चर्चेत कोणताही संदर्भ नसतांना आणि जी प्रकरणे अगोदरच न्यायप्रविष्ट आहेत, त्या संदर्भात महाराष्ट्राचे मंत्रीद्वयी नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांनी विनाकारण सनातन संस्थेवर आरोप केले आहेत.

त्यांचे हे आरोप खोटे, तसेच राजकीय हेतूने प्रेरित आहेत. याद्वारे एका हिंदुत्वनिष्ठ संस्थेला पर्यायाने हिंदुत्वालाच अपकीर्ती करण्याचा हेतू दिसून येतो, अशी भूमिका सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मांडली आहे.

(प्रसिद्धी पत्रक वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा.)

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात निर्बंध लागू केलेले असतांनाही सहस्रो लोकांचे मोर्चे काढून रझा अकादमीने केलेल्या दंगलीत महाराष्ट्र्र पेटला होता; पण त्यावर कारवाईची मागणी न करता, जितेंद्र नारायणसिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांचा शिरच्छेद करण्याची उघड धमकी देणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात न बोलता, कोणत्याही पुराव्याविना सनातन संस्थेवर देशव्यापी बंदी घालण्याची छगन भुजबळ यांची मागणी करत आहेत. हे म्हणजे ‘कुत्र्याला पिसाळलेला ठरवून त्याला ठार मारा’ या म्हणीप्रमाणे हिंदुविरोधी शक्ती सनातन संस्थेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो.


हे वाचा : विशेष अन्वेषण पथक स्थापून मंत्री आणि नेते यांना आलेल्या धमक्यांचे अन्वेषण करू ! – गृहमंत्री