अभिनेत्री सनी लिओनी यांच्या ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्यातून श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान !

सामाजिक माध्यमांतून हिंदूंचा विरोध

  • केंद्र सरकारने स्वतःहून नोंद घेत या गाण्यावर बंदी घातली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! मुळात परीक्षण मंडळ अशा गाण्यांना अनुमती कशी देते ? – संपादक
  • मुसलमान आणि अन्य धर्मीय यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर कायदा हातात घेतात. हिंदू मात्र वैध मार्गाने त्याला विरोध करतात. त्यामुळे कुणालाही हिंदूंचा धाक राहिलेला नाही. अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण करणे आवश्यक ! – संपादक
अभिनेत्री सनी लिओनी

मुंबई – अभिनेत्री सनी लिओनी यांचे ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘या गाण्यातून भगवान श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान करण्यात आल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाण्यावर बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी हिंदूंकडून सामाजिक माध्यमांवरून केली जात आहे.  गायिका कनिका कपूर यांनी हे गाणे गायले असून शरीब आणि तौशी यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्यामध्ये सनी लियोनी आणि कनिका कपूर अश्‍लील पद्धतीने नाचत आहेत.

सामाजिक माध्यमांतून अनेक हिंदूंनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, सध्या चित्रपट, गाणी आदींच्या माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याची प्रथाच चालू झाली आहे. ‘मधुबन’ हे गाणे त्यातलाच एक प्रकार आहे.

वरील गाणे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे गाणे प्रसिद्ध केले आहे. – संपादक