गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

ताज्या वृत्तानुसार जयेश साळगावकर सायंकाळी उशिरा सभापतींची भेट घेऊन आमदारकीचे त्यागपत्र देणार असून गोवा फॉरवर्ड पक्षही सोडणार आहेत.

महाराष्ट्रातील ५० सहस्र खेड्यांत आरोग्य सुविधांची विदारक स्थिती !

केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत असतांना राज्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती दयनीय का ? आरोग्य केंद्रांत आरोग्यसुविधा, नवीन तंत्रज्ञ, नोकरभरती का केली जात नाही ?

पणजी आणि मडगाव येथे २४ घंट्यांत १० सेंटीमीटर पावसाची नोंद

दक्षिण गुजरात तट आणि उत्तर कोकण ठिकाणच्या उत्तर-पूर्व अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्याने २ डिसेंबरलाही उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर येथील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उद्योजक असलेले काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे २ डिसेंबर या दिवशी भाग्यनगर येथे निधन झाले. त्यांच्यावर गेले काही दिवस भाग्यनगर येथे उपचार चालू होते.

कोरोना संसर्गाच्या काळानंतर संघकार्य गतीने वाढवावे ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

कोरोना काळात संघ स्वयंसेवकांनी अविरत सेवा केली. कांहींनी प्राणही गमावले. कोरोनानंतर संघ कार्याची गती अधिक वाढावी. संघ शताब्दी काळात संघ कार्याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवरून दिसेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे.

‘जोवाड’ चक्रीवादळ येण्याची हवामान विभागाची चेतावणी !

वादळ आणि हवामानातील पालट यांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह निलंबित !

गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

परराज्यातून येणार्‍यांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘केंद्र आणि राज्य सरकारांच्या नियमावलीतील तफावत दूर केली आहे. केंद्र शासनासमवेत चर्चा करूनच आता नवीन नियमावली येईल. ‘ओमिक्रॉन’विषयी आपण अधिक काळजी घ्यायला हवी.

पालथ्या घड्यावर पाणी !

आपल्या सरकारी यंत्रणांना बहुधा मागील प्रसंगातून शिकणे ठाऊकच नाही, हे सध्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या प्रकारावरून चालू असलेल्या गोंधळावरून दिसून येते.

सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पार्कींग’ला शिस्त लावण्यासाठी नियम लागू !

‘पार्कींगला शिस्त लावण्यासाठी एकही वाहन पोर्चमध्ये येणार नाही’, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वत:पासून सूचनांचे पालन करण्यास प्रारंभ केला.