पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) पणजी आणि मडगाव येथे गेल्या २४ घंट्यांत १० सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुने गोवे येथे ९ सेंमी, काणकोण, मुरगाव आणि दाबोली येथे ६ सेंमी, केपे, पेडणे, म्हापसा आणि सांखळी येथे ५ सेंमी, तर सांगे आणि वाळपई येथे ३ सेंमी पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण गुजरात तट आणि उत्तर कोकण ठिकाणच्या उत्तर-पूर्व अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्याने २ डिसेंबरलाही उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ डिसेंबरपासून या पावसाचा जोर अल्प होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.