कोल्हापूर, २ डिसेंबर – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उद्योजक असलेले काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे २ डिसेंबर या दिवशी भाग्यनगर येथे निधन झाले. त्यांच्यावर गेले काही दिवस भाग्यनगर येथे उपचार चालू होते.
वर्ष २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. आमदार चंद्रकांत जाधव यांना ऑगस्ट २०२० मध्ये कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्या वेळी त्यांच्यावर शस्त्रकर्म करण्यात आले होते; मात्र ८ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना भाग्यनगर येथे भरती करण्यात आले. उपचारांच्या कालावधीत रक्तदाब अल्प झाल्याने त्यांचे निधन झाले.