अवकाळी पावसामुळे पिकांच्या हानीची शक्यता !
मुंबई – एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे हवामान विभागाने ‘जोवाड’ चक्रीवादळ येण्याची चेतावणी दिली आहे.
Daily Weather Video (Hindi) Dated 30.11.2021:
Facebook link: https://t.co/nnkbL22u1x
Youtube Link: https://t.co/3TE1LsNaVU
— India Meteorological Department (@Indiametdept) November 30, 2021
वादळ आणि हवामानातील पालट यांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळ सिद्ध झाल्यामुळे पाऊस पडत आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने शेतकर्यांच्या रब्बी पिकांची पुष्कळ हानी होण्याची शक्यता आहे.