सिंधुदुर्ग – महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने वाळूची वाहतूक करणार्या होड्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाडीपात्रांमध्ये नोंदणीकृत नसलेल्या होड्यांची होडीच्या मालकांनी नोंदणी करून घ्यावी. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह बंदर, निरीक्षक, साहाय्य बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि होड्यांची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी झाल्यानंतर होडीचा नोंदणी क्रमांक, होडीचे आणि होडीच्या मालकाचे नाव होडीच्या दर्शनी भागावर दिसेल, अशा प्रकारे लावावे. जिल्ह्यातील सर्व खाडीपात्रांच्या पहाणीच्या वेळी नोंदणीकृत नसलेली होडी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, वेंगुर्ला यांनी कळवले आहे.