भावसत्संगाच्या वेळी रामनाथी आश्रमातील कु. माधुरी दुसे यांनी केलेल्या प्रार्थना !

१. ‘गुरुदेवा, चराचरात सामावलेले आपले चैतन्यमय स्वरूप अखंड अनुभवायचे आहे’, याची जाणीव आम्हाला प्रत्येक श्वासागणिक होऊदे !  : ‘जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण (प.पू. गुरुमाऊली), आम्ही अज्ञानी आणि असमर्थ जीव आहोत. आम्हाला तुमच्या स्वरूपाचे ज्ञान करून देण्यासाठी आणि ‘आम्हीही तुमचे अंश आहोत’, हे अनुभवता येण्यासाठी अन् आम्हाला तो आनंद प्रत्येक क्षणी घेता येण्यासाठी तुम्ही अखंड कार्यरत आहात.’ … Read more

शांत, संयमी आणि प्रेमभाव या गुणांमुळे गावकर्‍यांना आधार वाटणारे अन् औषधनिर्मिती आणि वैद्यकीय व्यवसाय सेवाभावाने करणारे पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) !

६.७.२०२१ या दिवशी पू. भावेकाका यांच्या देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने पू. भावेकाका यांचा मुलगा श्री. विक्रम भावे यांना लक्षात आलेली वडिलांची वैशिष्ट्ये त्यांच्याच शब्दांत येथे दिली आहेत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतलेल्या भावसत्संगाच्या ध्वनीचित्रफिती पहातांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती

‘या आपत्काळात प.पू. गुरुदेव मला घरबसल्या सत्संग देऊन अल्प प्रयत्नांत घरूनच माझ्याकडून समष्टी सेवाही करवून घेत आहेत’, या जाणिवेने माझे मन कृतज्ञतेने भरून आले.

‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) !

५ जुलै या दिवशी आपण पू. (सौ.) संगीता पाटील यांचे वैवाहिक जीवन, त्यांचा सनातन संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज आपण उर्वरित भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या नावाचा लक्षात आलेला भावार्थ

‘परात्पर गुरु डॉ. आठवले (परम पूज्य)’ या नावातील प्रत्येक अक्षरामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे’, हे मी मागील ३० वर्षांपासून अनुभवत आहे. ते सनातनच्या साधकांचे जीव कि प्राण आहेत.