गुरुपौर्णिमा हा सोहळा माझ्या गुरुमाऊलीचा ।

गुरुपौर्णिमा हा सोहळा माझ्या गुरुमाऊलीचा ।
सोहळा माझ्या गुरुमाऊलीचा ।
चातकस्वरूप साधकांच्या पर्वणीचा ।। १ ।।

गुरुकृपेत चिंब नहाण्याचा ।
गुरूंवर स्तुतीसुमने उधळण्याचा ।। २ ।।

गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा ।
गुरुचरणी लीन होण्याचा ।। ३ ।।

गुरूंना भावाश्रू वहाण्याचा ।
गुरुचरणी सर्वस्व अर्पिण्याचा ।। ४ ।।

गुरूंचा संकल्प सत्यात उतरवण्याचा ।
हिंदु राष्ट्र स्थापण्यास कटीबद्ध होण्याचा ।। ५ ।।

अनंत अपराधांविषयी क्षमायाचनेचा ।
स्वतःत सामावून घेण्यासाठी हट्ट धरण्याचा ।। ६ ।।

गुरूंशी एकरूप होण्याचा ।
सोहळा माझ्या गुरुमाऊलीचा ।। ७ ।।

– सौ. लक्ष्मी पिरगोंडा माळी, रत्नागिरी (१०.७.२०१४)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक