साधकांसाठी सर्वस्व असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले (परम पूज्य)’ या नावातील प्रत्येक अक्षरामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे’, हे मी मागील ३० वर्षांपासून अनुभवत आहे. ते सनातनच्या साधकांचे जीव कि प्राण आहेत. त्यांच्याच कृपेने मला त्यांच्या नावाचा अर्थ सुचला. तो येथे देत आहे.
डॉ – डॉक्टर म्हणूनी नावाजलेले विष्णुस्वरूप परम पूज्य ।
ज – जयंत अवतार, असे महर्षींनी संबोधलेले परम पूज्य ।
यं – यश नि कीर्ती यांचे अध्यात्मातील शिरोमणी परम पूज्य ।
त – तथास्तु म्हणूनी साधकांना आशीर्वाद देणारे परम पूज्य ।
बा – बालाजी देवतानामे संत-पिता असलेले परम पूज्य ।
ळा – लावूनी लळा, साधकांचे कल्याण करणारे परम पूज्य ।
जी – जीवनभर सनातन धर्मासाठी कार्य करणारे परम पूज्य ।
आ – आपत्काळी साधकांना रक्षण्या तत्पर असणारे परम पूज्य ।
ठ – ठकाशी ठक म्हणून वाईट शक्तींना हरवणारे परम पूज्य ।
व – वटवृक्षाच्या फांद्यांसम सनातन धर्म जगभर नेणारे परम पूज्य ।
ले – लेकरे मानूनी साधकांना मोक्षापर्यंत पोचवणारे परम पूज्य ।
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |