राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

वर्ष १९९४ ओबीसी आरक्षणात १८ टक्के वाढ करून तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुल्या प्रवर्गातील सामाजिक आणि शैक्षणिक सवलत घटनाबाह्य आणि बेकायदेशीररित्या समाविष्ट केली.

पुण्यातील गुंड सुलतान उपाख्य टिप्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई !

कायद्याचे भय न उरलेले धर्मांध ! पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच तडीपार असतांनाही गुन्हे करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाते याचा अर्थ गुन्हेगारांना पोलिसांचे भय उरलेले नाही, हे पोलीस खात्याला लज्जास्पद आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भर उन्हाळ्यात नद्यांना पूर

जिल्ह्याच्या काही भागांत ९ मे या दिवशी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता.

तिसरे महायुद्ध !

तिसरे महायुद्ध होणार आहे, हे आतापर्यंत जगातील बहुतेक लोकांना ठाऊक झाले आहे. ते कधी चालू होणार ? हे आता पहायचे आहे, असेच चित्र आहे; मात्र ते केव्हाच चालू झाले आहे आणि त्यात आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच अब्जावधी रुपयांची हानी होऊन जगात आर्थिक मंदी …

संतांना शरण जाऊन त्यांचे भावपूर्ण आज्ञापालन केल्यावर अंतरंगातील ईश्वराचे अस्तित्व अनुभवता येणे

सद्गुरु अनुताईंनी वैद्य उदय धुरी यांना दिलेले चैतन्य आणि केलेली मनाची सकारात्मक स्थिती यांमुळे त्यांनी सद्गुरु अनुताईंचे आज्ञापालन करण्याचे ठरवले; तरीही मन अजूनही कुठेतरी थोडे अस्वस्थ होते. तेव्हा त्यांच्या अंतरंगातील ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देतांना ईश्वराने त्यांना दिलेली ….

प्रतिदिन बलोपासना करून अंतर्बाह्य रामराज्य आणूया ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाने पित्याची आज्ञा मानून वनवास स्वीकारला. भरताने प्रभु श्रीरामाच्या पादुका ठेवून राज्यकारभार केला. ‘स्त्री’च्या रक्षणासाठी काय करावे ? हे आपल्याला रामायणातून शिकायला मिळते. तसेच आदर्श राज्य कसे असावे ? हे आपल्याला रामराज्यातूनच शिकायला मिळते.

रिलायन्स फाऊंडेशनचे कोरोनाग्रस्तांसाठी साहाय्य

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या की, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन कटिबद्ध आहे. आमचे आधुनिक वैद्य आणि अन्य कर्मचारी अहोरात्र राबून सेवा पुरवत आहेत. आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवत राहू.

गेल्या २० दिवसांत अलीगड मुस्लिम विद्यापिठातील १८ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू

अलीगड मुस्लिम विद्यापिठामध्ये गेल्या २० दिवसांमध्ये १८ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विद्यापिठाच्या काही माजी प्राध्यापकांचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

देहलीत एकाच रुग्णालयातील ८० कर्मचारी कोरोनाबाधित, तर एका डॉक्टरचा मृत्यू

येथील सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुमारे ८० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, तर ए.के. रावत या डॉक्टरचा यामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. रावत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

भंडारा येथे कोविड प्रभागात काम करणार्‍या ६ तरुणींना घरमालकाने घराबाहेर काढत त्यांचे सामान रस्त्यावर फेकले !

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड प्रभागात विविध पदांवर काम करत असलेल्या ६ तरुणींना कोरोनावाहक असल्याचा आरोप करत घरमालकाने घराबाहेर काढले, तसेच त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांचे सामानही रस्त्यावर फेकले. ही घटना ९ मे या दिवशी घडली.