१८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, , अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. 

मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍या दोघांना अटक

मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यावर बोगस ग्राहक पाठवले असता १६ सहस्र रुपयांना इंजेक्शनची विक्री होत असल्याचे आढळले.

चोख आणि प्रामाणिक काम हवे !

खासगी रुग्णालयांवर चाप बसवायलाच हवा. तिथे कुठल्याच शासकीय घटकाने भ्रष्टाचाराच्या स्वार्थांधतेला बळी पडून समाजद्रोह करायला नको. चोख आणि प्रामाणिक काम कोरोनाच्या साखळीला नक्कीच आटोक्यात आणील, यात शंका नाही !

अंबाजोगाई (बीड) येथे ऑक्सिजन खंडित झाल्याने ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अर्धा घंटा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. हा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळला. हे वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिले आहे.

कोरोना लसीकरण झालेल्या विक्रेत्यांनाच महापालिकेकडून घरपोच विक्री करण्यासाठी ‘पास’

ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अल्प आहे, त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ‘निगेटिव्ह’ असेल त्यांनाच घरपोच विक्रीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पास’ देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या उपचारांमध्ये मुंबई महानगरपालिका, केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याविषयी न्यायालयात याचिका !

‘रेमडेसिविर’च्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शासनाला द्यावा, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. कोरोनाच्या चाचणीचा अहवाल येण्यास २-३ दिवस विलंब होत आहे. त्यामुळे कोरोनावर उपचाराला विलंब होत आहे.

भिगवण येथील अनधिकृत पशूवधगृहावर पोलिसांची धाड !

या कारवाईत पशूवधगृहातील तिघांना कह्यात घेतले असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

संभाजीनगर जिल्ह्यातील ८१२ गावांत कोरोनाबाधित रुग्ण नाहीत ! – डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

डॉ. सुनील भोकरे पुढे म्हणाले की, ही गावे छोटी आणि अल्प लोकसंख्या असलेली असल्याने गावात गर्दी नाही, तसेच अधिक लोकांशी संपर्क नसल्याने सुरक्षित आहेत.

कोरोना लसीकरणासाठी आता कॉल सर्व्हिस ! – दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सांगली महापालिकेकडून कॉल सर्व्हिस सेवा चालू केली जाणार

धान्य वाटपाची थेट अनुमती द्यावी; अन्यथा धान्य वितरण थांबवणार !

अंगठा घेऊन धान्य देण्यासाठी ‘पॉस मशीन’चा उपयोग थांबवत थेट धान्य वाटपाची अनुमती द्यावी; अन्यथा जिल्ह्यातील धान्य वितरण थांबवू, अशी चेतावणी रेशन दुकानदार संघाने दिली आहे.