संभाजीनगर – कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस सर्वत्र वाढत आहे; पण अजूनही जिल्ह्यातील ८१२ गावांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी दिली.
डॉ. सुनील भोकरे पुढे म्हणाले की, ही गावे छोटी आणि अल्प लोकसंख्या असलेली असल्याने गावात गर्दी नाही, तसेच अधिक लोकांशी संपर्क नसल्याने सुरक्षित आहेत. कोरोनाचे रुग्ण आढळून आलेली एकूण गावे ९९५ आहेत, तर सध्या सक्रीय रुग्ण असलेल्या गावांची एकूण संख्या ६०४ आहे. ८१२ गावांत कोरोनाबाधित रुग्ण नाहीत.