१८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्याच्या अन्य सर्व व्ययांमध्ये कपात करून प्रसंगी कोरोनावरील लसीकरण वेगाने करण्यात येईल. त्यासाठी ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सीन’ या लसींसह परदेशातून अन्य लसी घेण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येते; मात्र हा ऑक्सिजन थेट रुग्णांना देता येत नाही. ‘लिक्विड ऑक्सिजन’ बॉटलिंग करण्याची आवश्यकता असते. राज्यातील अशा ६ ठिकाणी लवकरात लवकर ‘ऑक्सिजन बॉटलिंग’ करण्याचे ‘प्लान्ट’ उभारण्यात येणार आहेत.’’