सांगली, २० एप्रिल – महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सांगली महापालिकेकडून कॉल सर्व्हिस सेवा चालू केली जाणार आहे, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर उपाययोजना विषयी चर्चा करण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिका सभागृहात महापालिका अधिकारी, नगरसेवक, वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेतली. त्या वेळी ही माहिती त्यांनी दिली.