रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अर्धा घंटा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. हा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळला. हे वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिले आहे.
रुग्णालयातील दोन आणि तीन वार्डांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. तेथे ऑक्सिजन पुरवठा अर्धा घंटा खंडित झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला. रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी आरोप फेटाळतांना म्हटले की, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना कोरोनासमवेत सहव्याधी होत्या. रुग्णालयात येतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती. तीन-चार दिवसांपासून येथे ऑक्सिजनचा तुटवडा आहे; पण ऑक्सिजन मागवत आहोत. लातूरहून ऑक्सिजन आला आहे. या घटनेचा पूर्ण अहवाल मागवला आहे. त्यानंतर सर्व स्पष्ट होईल; मात्र पण ऑक्सिजन मिळाला नाही; म्हणून मृत्यू झाल्याचा आरोप चुकीचा आहे.’’