परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्या आंधळ्यासारखे असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्या आंधळ्यासारखे असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते.’
एखाद्या जिवात भाव असेल, तर देवतेचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी त्याला अलंकारांची आवश्यकता भासत नाही. अन्यथा भावविरहित अवस्थेत जिवाला अलंकार धारण केल्याने लाभ मिळतोच.
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आपल्या वागण्याचे कोणते परिणाम होतील, यावर दूरदृष्टी ठेवून आपण आपले प्रत्येक कार्य केले पाहिजे. त्यासाठी एखादी गोष्ट स्वतःला समजली नाही, तर ती आपण दुसर्यांना विचारून समजून घेऊन करावी.
‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सर्व भूतांच्या ठिकाणी जो आपलेच भगवद्स्वरूप बघतो आणि भगवद्स्वरूप असणार्या आपल्या ठिकाणी जो सर्व भूतांचे दर्शन घेतो अन् ज्याला आपल्या ठिकाणी सर्व भूतांचा अंतर्भाव झालेला दिसतो, तोच भागवतो नमः।’
‘शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, ‘‘हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण (चांगुलपणाने होणारी कृत्ये), रजोगुण (वासनांच्या आहारी जाऊन होणारी कृत्ये) आणि तमोगुण (अज्ञानामुळे होणारी कृत्ये).
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
जिव्हा आणि उपस्थ या दोन इंद्रियांचा कांंहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आतून आहे. विष पिऊनही सुखाने असणारे ‘शंकर’ कुणी असतील, तर असोत. नियमाला अपवाद असतो, तरी पण प्राय: (प्रथमतः) असेच दिसून येते. निःस्पृहाने जिभलीचे (जिभेचे) चोचले पुरवत बसू नये.’